Header Ads

कुसुम सौर ऊर्जा कृषी पंप योजना । Kusum Solar Energy Agriculture Pump Scheme

 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) अंतर्गत कुसुम सौर उर्जा अभियानाची सुरुवात झालेली आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते ज्यांना कुसुम सौर उर्जा कृषी पंप या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी कुसुम महाऊर्जा या ऑनलाइनवर वेबसाईटवर अर्ज करावा . 17 मे 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. Kusum solar


तसेच या योजनेचा लाभ शेतजमीन क्षेत्रानुसार आणि इतर अटींच्या पूर्ततेनुसार 3HP, 5HP आणि 7. HP अशा तीन प्रकारच्या मोटर मॉडेलचे आहेत. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महाऊर्जा मार्फत करण्यात आले आहे.  तरी  या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaurja.com. या संकेतस्थळावरती अर्ज करावा.

कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत सोलर पंपची किंमत आणि लाभार्थी हिस्सा.
सौर पंप क्षमतासौर पंप किंमतसामान्य श्रेणी (लाभार्थी हिस्सा)SC/ST श्रेणी (लाभार्थी हिस्सा)
3 HPRs. 1,93,803Rs. 19,380Rs. 9,690
5 HPRs. 2,69,746Rs. 26,975Rs. 13,488
7.5 HPRs. 3,74,402Rs. 37,440Rs. 18,720

आवश्यक कागदपत्रे :-

1)  आधार कार्ड
2)  बँक पासबुक झेरॉक्स
3)  पासपोर्ट साईज फोटो
4)  आठ -अ
5)  7/12 उताऱ्यावर विहीर किंवा कुपनलिका नोंद आवश्यक.

योजनेसाठी पात्रता :-


* विहीर ,बोरवेल ,बारामही वाहणारी नदी किंवा शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
* ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही ते शेतकरी.

महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया :-


   सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .www.mahaurja.com
आता मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची वरील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

कुसुम योजना हेल्पलाइन क्रमांक:-


या लेखात आम्ही तुम्हाला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404
टोल-फ्री क्रमांक- 18001803333

PM कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाईट पासून सावध रहा.
        तसेच सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी आपला अर्ज महाऊर्जाच्या  अधिकृत संकेतस्थळावरती आपला अर्ज नोंदवावा. इतर कुठल्याही वेबसाईट वरती आपला अर्ज नोंदवू नये.
सौर ऊर्जा कृषी पंप या नावाने अनेक बोगस वेबसाईट कार्यरत आहेत तरी आपण खात्री करून महाऊर्जाच्या संकेतस्थळावरती नोंद करावी.

ही माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. 
     Other information

No comments

Powered by Blogger.