Header Ads

पोहे । poha . Pohe |

 आपल्या रोजच्या जीवनात नाष्टा म्हटलं की आठवतो तो म्हणजे एक पदार्थ  पोहे , पण या पोह्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?कांदा पोहे अख्ख्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक नाष्टा


अहो महाराष्ट्र काय गुजरात मध्यप्रदेश मध्ये सुद्धा सकाळी सकाळी आई पोरांना कांदे, मिरची, कोथिंबीर चिरायला लावून पोहे फोडणीला टाकते. बनायला मॅगी पेक्षा फक्त दोन मिनिट जास्त वेळ घेणारा पदार्थ. पण खिसलेले खोबर, चिरलेल्या कोथिंबीरीने सजून गरमागरम पोहे आपल्या समोर आला की भलेभले आउट होतात.


तर काही जाणकार म्हणतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रातच लागला. तस म्हटल तर गुजरात आणि मध्यप्रदेशवाले पण दावा करतात. तज्ञांना विचारलं तर ते म्हणतात की पोहे हा पदार्थ तांदळापासून बनतो. मग तांदूळ पिकते अशा ठिकाणीच त्याचा शोध लागला असेल नां !

म्हणून महाराष्ट्रातच पोह्याचा शोध लागला असेल ही शक्यता आहे.


फक्त भारतच नाही तर कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स व्हिएतनाम या देशांमध्ये देखील पोह्यासारखा पदार्थ बनवला जातो. तिकडे आणखी वेगळ्या स्वरुपात पोहे खातात. त्याच नावही वेगळ आहे. पण आहे ते पोहेच. तिकडेही लोक रामाचे, बुद्धाचे भक्त आहेत. भारतीयांचे जीन्स त्यांच्यात आहेत म्हटल्यावर ते पण पोह्याचे फॅन्स असणे सहाजिक आहे म्हणा.

याच उत्तर आहे लई वर्षांपूर्वी शोध लागला. अगदी महाभारतात जाऊन बघितल तरी पोह्याचा उल्लेख आढळतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदाम्याला त्याच्या बायकोने पुरचुंडीत पोहेच बांधून दिलेले आणि मुरलीधर कृष्णाने ते अगदी आवडीने खाल्ले देखील होते. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्याच्या आधी देखील हा पोहे बनवले जात होते हे नक्की. 

इंडोनेशिया सोडा अगदी ब्रिटीशसुद्धा पोह्याचे फॅन्स होते.

ते जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्यांच्या सैनिकांना भारतातल्या वातावरणात टिकण्यासाठी त्यांना पोटाला झेपेल असा पदार्थ म्हणून त्यांनी पोह्याची निवड केली होती. पोहे टिकायचेही जास्त दिवस. म्हणूनच जेव्हा भारतातून त्यांचं जहाज इंग्लंडला परत जायचं तेव्हा प्रत्येक सैनिकाला सुदाम्याप्रमाणे पोहे पॅक करून दिले जायचे, प्रवासात खाण्यासाठी.


पुण्याच्या पेठांमध्ये एमपीएससी करणाऱ्या पोरांना मात्र आजही पुराणातल्या काळाप्रमाणे कांदा, मिरची नसलेले फक्त हळद वाले पोहे खाण्याच भाग्य मिळत. तरी त्यातील काही संस्कृतीला विसरणारे विद्यार्थी महाभारतकालीन पोहे खाताना त्यावर तर्री मागुन घेतात. हेच पोहे खाऊन महाराष्ट्रातले अधिकारी तयार झालेत हा इतिहास आहे.

No comments

Powered by Blogger.