Header Ads

जेवताना व जेवनानंतर पाणी पिण्याची सवय बदला कारण - ऐकून व्हायल थक्क.

 


आपण - ॲसेडीटी , गँसेस , वाताचे विकार , हृदयविकार (हार्टअटॅक), लठ्ठपणा इ. अनेक  व्याधीनी त्रस्त आहात का .. 

ही फक्त एकच सवय तुम्हाला या आजारापासून बरी करेल. पाणी पिण्याची सवय - होय पाणी पिण्याची सवय जेवताना आणि जेवनानंतर पाणी पिण्याची सवय बदला .

या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. पण आपण काही सवयी बदलून आपले आरोग्य सुधारु शकतात.

 चला तर जाणून घेऊ या.


१. रोज सकाळच्या व सायंकाळच्या जेवणाची वेळ निश्चित करून घ्या, असे शक्य नसल्यास तुमच्या रोजच्या जेवना अगोदर १ ते पाऊण तास आधी तुम्हाला हवे तेवढे पाणी प्या, ही सवय कायम करा. कोठेही असलात तरी एक तास अगोदर पाणी पिण्यास अडचण येत नाही (प्रवास, ऑफिस इ.यावेळी सोबत पाणी ठेवा) .


२. जेवतांना किंवा जेवनानंतर अजीबात पाणी पिऊ नका.

 आपल्याला जेवताना पाणी पिण्याची सवय असते ती सवय बदला. 

३. फक्त जेवतांना पोळी खाणे संपल्यावर आणि भात खाण्यास सुरुवात करण्या अगोदर (दोन अन्नांमध्ये) फक्त दोन घोट पाणी प्या. तसेच जेवनानंतर संपूर्ण तोंड व गळा स्वच्छ करण्यासाठी फक्त २ घोट पाणी पिण्याची मुभा.


४. मात्र जेवण झाल्यानंतर कटाक्षाने रोज दिड तासांनी पाणी प्या. ( सवय लागण्यासाठी अगोदर १५ मिनीट, नंतर अर्धा तास असे करत तोंडात पाणी गुळगुळ करत असताना पाणी पिण्याची सवय हळूहळू दीड तासापर्यंत वाढवा. व कायम करा.

कारण :- आपण जेवतांना आणि जेवनानंतर पाणी पिल्यामुळे प्रदीप्त झालेला  (पेटलेला) जठराग्नी लगेच विझतो, व पचनाची क्रिया बंद पडते. ज्या प्रमाणे एखाद्या शेकोटीवर पाणी टाकल्यावर ती विझते तसाच  प्रकार पोटामध्ये पाणी पिण्यानंतर होतो. मग अन्न पचण्याऐवजी सडते व  वायू (गँस) निर्माण होऊन अनेक रोग होतात. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ सर्व साधारण पणे अन्न पचण्यास दीड तास लागतो. म्हणून दोन्ही ही वेळेच्या जेवनानंतर दिलेल्या सुचनानुसार दीड तासानंतर पाणी प्यावे.व एक तास अगोदर पुरेसे पाणी पिले असल्यामुळे जेवनानंतर पाणी पिण्याची आवश्यकता भासत नाही. 

याशिवाय.......

 ५. रोज रात्री झोपताना तोंड स्वच्छ करून झोपावे. आणि सकाळी उठल्यानंतर तोंड स्वच्छ न करता क्षमतेनुसार कोमट पाणी प्यावे . व शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यात रात्री ठेवलेले  साधारणतः १ लिटर पाणी गुळगुळ करत प्यावे.  कारण रात्री आपल्या तोंडाला जमा झालेली लाळ अदभूत व औषधी लाळ असते .


६. आयुष्यात थंड पाणी पिऊ नका. (फक्त उन्हाळ्याच्या दिवसात माठातील पाणी पिण्यास चालते फ्रीजमधील किंवा इतर खूप थंड पाणी वर्ज करावे.


बस्स एवढेच करा आणि  , अनेक रोगापासून मुक्ती मिळवून निरामय जिवनाचा फुकटात आनंद लुटा.


CLICK HERE


तुम्ही करा आणि इतरांना सांगा.

No comments

Powered by Blogger.