Header Ads

Maharashtra Cabinet Decision । सुमारे 41 लाख लाभर्थ्यांना फायदा

शेतकऱ्यांच्या विषयावर चिंता व्यक्त :

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जवळपास 40 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकरी, तसेच आरोग्य विभागासह वेगवेगळ्या विभागांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.




राज्य मंत्री मडंळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली .या बैठकीत राज्य मत्री मंडळाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. 


शेतकऱ्यांच्या विषयावर मंत्रिमंडळाकडून बैठकीत चिंता व्यक्त

राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचं संकट येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयी चिंता व्यक्त करण्यात आली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये दुबार पेरणी करण्याची शक्यता ओढावू शकते. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर बी-बियाणे उपलब्ध ठेवण्याचे मंत्रिमंडळ बैठकीतून आदेश देण्यात आले आहेत.


संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना 

या योजनेतील लाभार्थ्यांना 1000 रुपया ऐवजी आता 1500 रुपये मिळणार. या योजनेचा लाभ सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना होईल.तसेच


आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेचा महाराष्ट्रात विस्तार करुन 5 लाखांपर्यंतच्या उपचारांचे लाभ :


+महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत उपचारांची मर्यादा आता ₹5 लाख

+ मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी खर्च मर्यादा ₹2.5 लाखांहून ₹4.5 लाख

+ मागणी नसलेल्या 181 उपचारांना वगळले, तर मागणी असलेल्या 328 उपचारांचा समावेश.

+ त्यामुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना तसेच महात्मा फुले जनारोग्य योजनेत 1365 विकारांवर उपचार

+ 1000 रुग्णालयांमध्ये उपचारांची सुविधा

+ महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जनारोग्य योजना लागू

+ दोन्ही योजनांचे एकत्रित कार्ड, पोर्टेबिलिटीचीही सुविधा


* महाराष्ट्रातील सीमेलगतच्या 8 जिल्ह्यांत 140 रुग्णालय, तर कर्नाटकातील 4 जिल्ह्यांत 10 तसेच राज्यातील आणखी 200 रुग्णालयांचा समावेश


+ स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत उपचार संख्या 74 वरुन 184 आणि खर्च मर्यादेत 30 हजारांवरून 1 लाख इतकी वाढ


दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनासुद्धा मोफत गणवेश योजनेचा लाभ 


> मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देणार


★ सध्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या वर्गातील सर्व मुली व अनुसूचित जाती जमातीची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश देण्यात येतो.

★ सामाजिक विषमता दूर करण्यासाठी वरील मुलांबरोबरच या योजनेपासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय

• त्यासाठी ₹75.60 कोटी इतका अतिरिक्त निधी देण्यात येणार

> त्याचप्रमाणे, सदर गणवेशासोबत सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व 2 जोडी पायमोजे देण्यास मान्यता, यासाठी ₹82.92 कोटी


असे सर्व सामान्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याचबरोबर खालील निर्णय घेतले आहेत.


मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची थोडक्यात माहिती
:

  • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

(सार्वजनिक बांधकाम)

• एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव (नगर विकास विभाग)

• राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता (सार्वजनिक आरोग्य विभाग )

• भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ (जलसंपदा विभाग )

• महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. २ कोटी कार्ड्स वाटणार आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

• संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ (सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)

• आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार (कामगार विभाग)

• नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)

• मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार (जलसंपदा विभाग)

• मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड (महसूल विभाग)

•भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण (महसूल विभाग)

• मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये (विधी व न्याय विभाग)

• राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

• सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार (वित्त विभाग)

• बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित (गृहनिर्माण विभाग)’

• जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता (परिवहन विभाग)

• राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता (वैद्यकीय शिक्षण विभाग)

• बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय (कृषि विभाग)

• दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार (नगरविकास विभाग)’

• दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ ( शालेय शिक्षण)

• देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता (मृद व जलसंधारण)

• चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट (कृषी विभाग)

• ‘सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता (जलसंपदा विभाग)

• ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ (ग्रामविकास विभाग)

• पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार (मत्स्य व्यवसाय विभाग)

• पर्यटन उपविभागासाठी उप सचिव (पर्यटन विभाग)


असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

No comments

Powered by Blogger.