Header Ads

TCS QUESTION | TEST series

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात.' TCS ' PATTERN.
अनेक विद्यार्थ्यांना TCS व IBPS या कंपन्यांच्या घेण्यात येणाऱ्या परिक्षा बद्दल खुप confusion असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही परिक्षेचा अभ्यास करताना त्या परिक्षेचा Pattern आणि मागील प्रश्न पत्रिकांचाही अभ्यास असायला हवा. TCS द्वारे घेतल्या गेलेल्या MAHDHA, WRD, ITI या प्रश्न पत्रिकांचा अभ्यास करून भविष्यात घेतल्या जाणाऱ्या Vanrakshak, TALATHI, EXCISE , ZP BHARTI अश्या अनेक परिक्षा साठी खालील प्रश्न उपयुक्त ठरतील.
.

Q.1 पौर्णिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

 • 1. सुर्यप्रकाश
 • 2. चांदणे
 • 3. चंद्रप्रकाश
 • 4. अमावस्या

.

Q.2 मुलांना ( आंबट ) बोरे आवडतात . कंसातील शब्दाचा प्रकार ओळखा ?

 • 1. क्रियापद
 • 2. विशेषण
 • 3. भाववाचक नाम
 • 4. सर्वनाम

.

Q.3 'दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ?

 • 1. रांगोळ्या
 • 2. सर्वांनी
 • 3. काढल्या
 • 4. पुढे

.

Q.4 पुढील पैकी कोणता शब्द 'प्रौढी' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.?

 • 1. फुशारकी
 • 2. प्रसिद्धी
 • 3. बढाई
 • 4. शेखी

.

Q.5 'त्याला खुप समजावून सांगितले, पण तो ऐकत नाही. ' या वाक्यातील अव्यय शोधा ?

 • 1. खूप
 • 2. ऐकत
 • 3. पण
 • 4. नाही

.

Q.6 पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?

 • 1. गोपिकांचे भान आणि गाईगुरांचे बासरीच्या नादाने कृष्णाच्या हरपून जात असे.
 • 2. गोपिकांचे बासरीच्या नादाने कृष्णाच्या आणि गाईगुरांचे भान हरपून जात असे.
 • 3. गोपिकांचे आणि गाईगुरांचे नादाने कृष्णाच्या बासरीच्या भान हरपून जात असे.
 • 4. कृष्णाच्या बासरीच्या नादाने गोपिकांचे आणि गाईगुरांचे भान हरपून जात असे.

.

Q.7 ' नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ?

 • 1. खूप मोठा खर्च करणे
 • 2. सर्वत्र सारखीच स्थिती असणे
 • 3. एखाद्या गोष्टीशी कोणताच संबंध नसणे
 • 4. काम करता न आल्यामुळे संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.

.

Q.8 अभिजितने बाजारातून भाजी आणली, या वाक्यातील कर्म सांगा ?

 • 1. भाजी
 • 2. अभिजित
 • 3. बाजारातुन
 • 4. आणली

.

Q.9 शिपायाकडून चोर पकडण्यात येतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा?

 • 1. कर्मकर्तरी
 • 2. सकर्मक कर्तरी
 • 3. भाव कर्तरी
 • 4. अकर्मक कर्तरी

.

Q.10 मी क्रिकेट खेळतो. या वाक्याचे साधा भूतकाळातील रूप ओळखा ?

 • 1. मी क्रिकेट खेळेन
 • 2. मी क्रिकेट खेळलो.
 • 3. मी क्रिकेट खेळत असतो.
 • 4. मी क्रिकेट खेळत असे

.

Q.11 मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी.' या वाक्याचा प्रकार ओळखा. ?

 • 1. विध्यर्थी वाक्य
 • 2. स्वार्थी वाक्य
 • 3. संकेतार्थी वाक्य
 • 4. आज्ञार्थी वाक्य

.

Q.12 'वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू ( देणे )' - कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून भूतकाळी वाक्य बनवा. ?

 • 1. देणार
 • 2. देईन
 • 3. दिलो
 • 4. दिली

.

Q.13 'ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास......... आवश्यकता असते, त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.?

 • 1. सर्वनामाची
 • 2. नामाची
 • 3. कर्माची
 • 4. विशेषणाची

.

Q.14 ' बापरे ! रस्त्यावर केवढी ही गर्दी' ! या वाक्याचा प्रकार ओळखा.?

 • 1. नकारार्थी वाक्य
 • 2. उद्गारार्थी वाक्य
 • 3. प्रश्नार्थी वाक्य
 • 4. आज्ञार्थी वाक्य

.

Q.15 खाली काही सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे त्यांतील कोणता पर्याय चुक आहे ?

 • 1. यथाशक्ती- शक्तिप्रमाणे
 • 2. यथाक्रम- क्रमाप्रमाणे
 • 3. प्रतिवर्ष- प्रत्येक वर्ष
 • 4. आमरण- जन्मेपर्यंत

.

Q.16 खालील पैकी पुल्लिंगी नाम कोणते आहे ?

 • 1. तेल
 • 2. फळ
 • 3. स्वर्ग
 • 4. युक्ती

.

Q.17 'पूर्णांक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

 • 1. अपूर्णांक
 • 2. अंक
 • 3. प्रश्नचिन्ह
 • 4. दशांश

.

Q.18 प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत ?

 • 1. सात
 • 2. तीन
 • 3. नऊ
 • 4. पाच

.

Q.19 'त्रैलोक्य' या शब्दाचा समास ओळखा ?

 • 1. तत्पुरुष
 • 2. द्वंद्व
 • 3. अव्ययीभाव
 • 4. द्विगू

.

Q.20 'लेखणी' या शब्दाचे अनेकवचन सांगा ?

 • 1. लेखक
 • 2. लेखी
 • 3. लेखण्या
 • 4. लेखन

.

Q.21 "रघुनाथ, गणेश आणि साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत." वाक्यात किती कर्ता आहेत.?

 • 1. चार
 • 2. एक
 • 3. दोन
 • 4. तीन

.

Q.22 पुढील आठवड्यात शास्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. वाक्याचा काळ ओळखा ?

 • 1. साधा वर्तमानकाळ
 • 2. अपूर्ण भुतकाळ
 • 3. भूतकाळ
 • 4. भविष्य काळ

.

Q.23 'ययाती या कादबंरीचे लेखक कोण ?

 • 1. वि.स.खांडेकर
 • 2. रणजित देसाई
 • 3. रा.रं. बोराडे
 • 4. आनंद यादव

.

Q.24 राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या ?

 • 1. गोविंदाग्रज
 • 2. अनिल
 • 3. केशवसुत
 • 4. बालकवी

.

Q.25 'त्याने घराजवळ गाडी उभी केली.'या वाक्यातील कर्म सांगा ?

 • 1. घराजवळ
 • 2. गाडी
 • 3. त्याने
 • 4. केली

. आणखी वाचा
. तसेचTCS परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी दररोज एक Test uploadकेली जाईल.

No comments

Powered by Blogger.