Header Ads

TCS /IBPS QUESTION , TEST SERIES

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात.' TCS ' PATTERN.
अनेक विद्यार्थ्यांना TCS व IBPS या कंपन्यांच्या घेण्यात येणाऱ्या परिक्षा बद्दल खुप confusion असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही परिक्षेचा अभ्यास करताना त्या परिक्षेचा Pattern आणि मागील प्रश्न पत्रिकांचाही अभ्यास असायला हवा. TCS द्वारे घेतल्या गेलेल्या MAHDHA, WRD, ITI या प्रश्न पत्रिकांचा अभ्यास करून भविष्यात घेतल्या जाणाऱ्या Vanrakshak, TALATHI, EXCISE , ZP BHARTI अश्या अनेक परिक्षा साठी खालील प्रश्न उपयुक्त ठरतील.
.

Q.1मी निबंध लिहिला असेन. या वाक्याचा काळ ओळखा. ?

 • 1. रीतीवाचक भविष्यकाळ
 • 2. पूर्ण भविष्यकाळ
 • 3. अपूर्ण भविष्यकाळ
 • 4. साधा भविष्यकाळ

.

Q.2 वेळ' या शब्दाचे वचन बदला?

 • 1. समय
 • 2. काळ
 • 3. वेळा
 • 4. वेळी

.

Q.3 विद्वान या शब्दाचे लिंग बदला?

 • 1. विधुर
 • 2. विधवा
 • 3. विदुषी
 • 4. विदुर

.

Q.4 माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले.'त्यात रंगीत चित्रे होती .' वाक्याचे केवलवाक्य करा.?

 • 1. माझ्या एक दादाने मला रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले.
 • 2. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले.
 • 3. एक रंगीत चित्राचे मला दादाने माझ्या पुस्तक पाठवले.
 • 4. माझ्या रंगीत चित्राचे एक पुस्तक दादाने मला पाठवले.

.

Q.5 मुलींनी आता शाळेत जावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. ?

 • 1. कर्मणी प्रयोग
 • 2. कर्तरी प्रयोग
 • 3. भावे प्रयोग
 • 4. कर्तकर्म संकरप्रयोग

.

Q.6 मेधावी म्हणजे........?

 • 1. बलवंत
 • 2. पुण्यवंत
 • 3. प्रज्ञावंत
 • 4. गुणवंत

.

Q.7 'कीर्ती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

 • 1. अज्ञानी
 • 2. अर्थपूर्ण
 • 3. अपकिर्ती
 • 4. अनास्था

.

Q.8 पुढील पैकी कोणता शब्द 'रावा' शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 • 1. शुक
 • 2. राघू
 • 3. पल्लव
 • 4. पोपट

.

Q.9 खारीक' चे अनेकवचन कोणते .?

 • 1. खारिकी
 • 2. खार
 • 3. खारका
 • 4. खारी

.

Q.10 आईने आपल्या बाळाला निजवले . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

 • 1. निजवले
 • 2. बाळाला
 • 3. आपल्या
 • 4. आईने

.

Q.11 'त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती. या वाक्यातील विशेषण शोधा.?

 • 1.हिरव्यागार, रंगीत, सुगंधी
 • 2. सुगंधी, रंगीत होती
 • 3. बाग, रंगीत, लयलूट
 • 4. रंगीत, फुले, अगदी

.

Q.12 जेव्हा क्रियापदाचे रुप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगानुसार बदलत नसुन ते नपुसकलिंगी, त्रुतीयपुरुषी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात.?

 • 1. भावे प्रयोग
 • 2. अकर्मक कर्तरी प्रयोग
 • 3. कर्मणी प्रयोग
 • 4. सकर्मक कर्तरी प्रयोग

.

Q.13 'ओळखलंत का सर मला ?' ही प्रसिद्ध कविता 'कणा' कोणत्या कवीची आहे ?

 • 1. मंगेश पाडगावकर
 • 2. कुसुमाग्रज
 • 3. शांता शेळके
 • 4. इंदिरा संत

.

Q.14 वर्तमानकाळाचे वाक्य निवडा?

 • 1. अपर्णा गावाला गेली.
 • 2. हिवाळ्यात दिवस मोठा असतो.
 • 3. वैदेही, मुक्ता आणि प्रिया रडल्या
 • 4. आज रमा आनंदून जाईल.

.

Q.15 हरिहर, स्रीपुरुष, कुष्णार्जुन हे कोणत्या सामासाचे उदाहरण आहे ?

 • 1. बहुव्रिही समास
 • 2. द्वंद्व समास
 • 3. द्विगू समास
 • 4. अव्ययीभाव समास

.

Q.16 'बहकणे' म्हणजे काय ?

 • 1. वाहवत जाणे
 • 2. चोप देणे
 • 3. ढोंग
 • 4. खोट्या सबबी देणे

.

Q.17 'गोखल्यांच्या घरातला रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता शोधा.?

 • 1. गोखले
 • 2. घरातला
 • 3. सकाळी
 • 4. रेडिओ

.

Q.18 ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना......... क्रियापद म्हणतात.?

 • 1. सकर्मक
 • 2. सिद्ध
 • 3. साधीत
 • 4. अकर्मक

.

Q.19 वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण येथे होते ?

 • 1. संत एकनाथ
 • 2. संत तुकाराम
 • 3. संत जनाबाई
 • 4. संत कान्होपात्रा

.

Q.20 माणसे या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?

 • 1. मांस
 • 2. मासा
 • 3. माणूस
 • 4. माणुसकी

.

Q.21 'कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो.' हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे ?

 • 1. कर्तरी प्रयोग
 • 2. कर्मणी प्रयोग
 • 3. पुराण कर्मणी प्रयोग
 • 4. भावे प्रयोग

.

Q.22 ' समशेर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

 • 1. प्रख्यात
 • 2. तलवार
 • 3. कुर्हाड
 • 4. भाला

.

Q.23 'सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत.' या वाक्याचा काळ ओळखा ?

 • 1. पूर्ण वर्तमानकाळ
 • 2. साधा वर्तमानकाळ
 • 3. रीति वर्तमानकाळ
 • 4. अपुर्ण वर्तमानकाळ

.

Q.24 'दास' या शब्दाचे लिंग बदला ?

 • 1. दासी
 • 2. नोकर
 • 3. सेवक
 • 4. चाकर

.

Q.25 'मुलांनी पालकांना घेऊन यावे.' या वाक्याचा प्रयोग ओळखा. ?

 • 1. कर्तरी
 • 2. सकर्मक भावे
 • 3. कर्मणी
 • 4. अकर्मक भावे

. आणखी वाचा
. तसेच Tcs परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी दररोज एक Test Uploadकेली जाईल.

No comments

Powered by Blogger.