Header Ads

शिवराज्याभिषेक , shivrajyabhishek .

 

गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. #शिवराज्याभिषेक


शिवरायांचा राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना होती. या प्रसंगी अशा अनेक गोष्टी झाल्या ज्यांची नोंद इतिहासाने घेतली पण आजही सर्वसामान्य जनता या वैभवापासून अनभिज्ञ आहे.

शिवरायांनी राज्याभिषेकासमयी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. स्वराज्याचा अधिकृत ध्वज म्हणून भगव्या झेंड्याला मान्यता दिली, तर स्वराज्याच्या कोणत्याही राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी ‘जरीपताका’ फडकवण्याचा आदेश दिला.


ज्या किल्ले रायगडावरती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला त्या किल्ले रायगडाचे 

कवी भूषण यांनी वर्णन केले आहे. तो लिहतो :

शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले.

या किल्ल्यावरील शिवरायांचा दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजु लागला. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे, की त्यात तिन्ही लोकांचे वैभव साठवले आहे.

किल्ल्याखालचा भूभाग जलमय पातळप्रमाणे , माची म्हणजे पायथ्याचा उंचवट्याचा भाग पृथ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरी प्रमाणे शोभतो.

रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभत आहेत.

गडावरील विहिरी, सरोवरे व कुप विराजित आहेत.

चारही दिशाकडे चंपा ,चमेली, चंदन, रायआवळा,लवंग, वेलदोडे, केळी यांची झाडे व वेल आहेत.

अमृता पेक्षाही मधुर व रसाळ फळे देणारे आम्रवृक्ष आहेत.

असा होता रायगड.#शिवराज्याभिषेक


शिवरायांनी स्वराज्याची स्वतंत्र चलनव्यवस्था उभी केली.


म्हणजे महाराजांच्या राज्यात त्यांच्याच नावाने पाडलेली नाणी फिरू लागली. यामार्गे शिवरायांनी स्वतःची अर्थव्यवस्था प्रणाली उभी केली. शिवरायांनी शिवशक सुरू केला. एक नवीन कालगणना भारताच्या इतिहासाला उपलब्ध झाली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र असलेल्या कितीतरी फ्रेम महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्या चित्रात शिवरायांना मुजरा करणारा इंग्रज अधिकारी हेन्री होय.आणि याच 

हेन्री ने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आपल्या शब्दात केले आहे.


6 जुन 1674 या दिवशी हेन्री सकाळी सातच्या सुमारास दरबारात आला, शिवाजी महाराजांसमोर झुकला. त्याने महाराजांना लवून मुजरा केला. 

महाराजांनी त्याला सिंहासनाच्या पायरीवर बोलावून घेतले व त्याने आणलेली हिऱ्याची अंगठी महाराजांना नजर केली.

हेन्री फार थोडा वेळ सिंहासनाजवळ होता . त्यावेळेस हेन्रीने जे काही पाहिले त्याचे वर्णन त्याने केले आहे.

सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निदर्शक व राजसत्तेचा द्योतक चिन्हे मी पहिली. उजव्या हाताला मोठ्या दातांच्या मत्स्याची दोन मोठी सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातात अनके अश्वपुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.


राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो, तिथे दोन हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूस झुलत होते. दोन देखणे पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट, कि हे प्राणी कुठून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हाला करवेना.


हेन्रीने पुढे शिवाजी महाराजांना बद्दल लिहिले आहे, जी सर्वात महत्वपूर्ण नोंद आहे.


‘शिवाजी ४७ वर्षाचा देखणा होता. त्याच्या चेहर्यावरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्याचा वर्ण इतर मराठ्यापेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्याच्या दाढीस निमूळतेपणा असून बारीक मिशी (म्हणजे विरळ) होती. त्याचे भाषण निश्चयपूर्ण, स्पष्ट पण जलद होते.’


इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला.


No comments

Powered by Blogger.