Header Ads

TCS / IBPS QUESTION PAPER

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात.' TCS ' PATTERN.
अनेक विद्यार्थ्यांना TCS व IBPS या कंपन्यांच्या घेण्यात येणाऱ्या परिक्षा बद्दल खुप confusion असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही परिक्षेचा अभ्यास करताना त्या परिक्षेचा Pattern आणि मागील प्रश्न पत्रिकांचाही अभ्यास असायला हवा. TCS द्वारे घेतल्या गेलेल्या MAHDHA, WRD, ITI या प्रश्न पत्रिकांचा अभ्यास करून भविष्यात घेतल्या जाणाऱ्या Vanrakshak, TALATHI, EXCISE , ZP BHARTI अश्या अनेक परिक्षा साठी खालील प्रश्न उपयुक्त ठरतील.

.

Q 1. 'काठ्या' शब्दाचे एकवचन कोणते आहे ?

 • 1. काठी
 • 2. काटा
 • 3. काठ
 • 4. काडी

.

Q 2. 'परिमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

 • 1. विवाह
 • 2. सुगंध
 • 3. प्रदक्षिणा
 • 4. परिचय

.

Q 3. 'चातुर्मास' हा समासाचा कोणता प्रकार आहे ?

 • 1. द्वंद्व समास
 • 2. तत्पुरुष समास
 • 3. द्विगू समास
 • 4. अव्ययीभाव समास

.

Q 4. 'अशोक पतंग उडवतो.' या वाक्यातील प्रयोग सांगा ?

 • 1. कर्मणी प्रयोग
 • 2. सकर्मक कर्तरी प्रयोग
 • 3. भावकर्तरी प्रयोग
 • 4. भावे प्रयोग

.

Q 5. 'शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता. ' या वाक्यातील काळ ओळखा ?

 • 1. अपूर्ण भूतकाळ
 • 2. पूर्ण भूतकाळ
 • 3. साधा भूतकाळ
 • 4. रीती वर्तमानकाळ

.

Q 6. 'आज भारतीय संघ खूप चांगला खेळला.' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचुक रुपांतर कोणते असेल ?

 • 1. भारतीय संघ किती चांगला खेळला आज ?
 • 2. भारतीय संघ आज खुप चांगला खेळला का ?
 • 3. भारतीय संघ खुपच चांगला खेळला आज.
 • 4. किती चांगला खेळला आज भारतीय संघ !

.

Q 7. जेव्हा क्रियापदाचे रुप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी, तूतीयपुरुषी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात ?

 • 1. भावे प्रयोग
 • 2. अकर्मक कर्तरी प्रयोग
 • 3. कर्मणी प्रयोग
 • 4. सकर्मक कर्तरी प्रयोग

.

Q 8. 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

 • 1. अपकर्ष
 • 2. उन्नती
 • 3. उत्तेजन
 • 4. हर्ष

.

Q 9. 'पांढरपेशा' शब्दातून काय अर्थ सूचित होतो ?

 • 1. समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला
 • 2. पांढऱ्या रंगाचा
 • 3. अरुंद वाट
 • 4. चुना

.

Q 10. प्रमाणलेखनाच्या नियमांप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडा ?

 • 1. मि नीराशेमूळे गावी पर्तनाच्या नीर्णय घेतला.
 • 2. एक नामवंत नाट्यदिग्दर्शक शाळेत येतील.
 • 3. मि तूच्याकडुन एक पुस्तक घेतले होते.
 • 4. ही पेन खुप महाग आहे.

.

Q 11. खालील अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधा ?

 • 1. क्लेश
 • 2. रोमांच
 • 3. डोहाळे
 • 4. घड्याळ

.

Q 12. आधुनिक मराठी कवितेचे हा मान कोणाला दिला जातो ?

 • 1. केशवसुत
 • 2. शांता शेळके
 • 3. कुसुमाग्रज
 • 4. अनिल

.

Q 13. "एका रात्री राक्षस गुपचूप झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीच्या मुलाला पळवले" वाक्य रचनेत कोणता काळ वापरला आहे ?

 • 1. भविष्य काळ
 • 2. भूतकाळ
 • 3. साधा वर्तमानकाळ
 • 4. वर्तमानकाळ

.

Q 14. नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दाला काय म्हणतात ?

 • 1. क्रियाविशेषण
 • 2. सर्वनाम
 • 3. नाम
 • 4. विशेषण

.

Q 15. 'अज्ञात झर्यावर' हा कथासंग्रह कोणी लिहिला ?

 • 1. अरुणा ढेरे
 • 2. ज.वि. पवार
 • 3. वि. स. खांडेकर
 • 4. ना.सी. फडके

.

Q 16. 'ज्ञानेश्वरी ' ही कोणत्या संस्कृत भाषेतील ग्रंथावर आधारित आहे ?

 • 1.वाल्मिकी रामायण
 • 2. भगवद्गीता
 • 3. रघुवंश
 • 4. शाकुंतल

.

Q 17. आई मुलीला भरतकाम शिकवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा ?

 • 1. द्विकर्मक क्रियापद
 • 2. अकर्मक क्रियापद
 • 3. सकर्मक क्रियापद
 • 4. उभयविध क्रियापद

.

Q 18. 'यथावकाश' या शब्दाचा समास ओळखा ?

 • 1. इतरेतर द्वद्व समास
 • 2. समाहर द्वंद्व समास
 • 3. अव्ययीभाव समास
 • 4. द्विगू समास

.

Q 19. मराठीचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते ?

 • 1. बाळशास्त्री जांभेकर
 • 2. संत तुकाराम
 • 3. दादोबा पांडुरंग तर्खडकर
 • 4. महात्मा फुले

.

Q 20. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो. - या वाक्याचा प्रकार ओळखा ?

 • 1. प्रधानवाक्य
 • 2. केवळवाक्य
 • 3. सयुक्तवाक्य
 • 4. गौण वाक्य

.

Q 21. 'अचेतन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

 • 1. चैतन्यरहित
 • 2. विनाशी
 • 3. अजरामर
 • 4. सजीव

.

Q 22. 'सगेसोयरे' या शब्दाचा समास ओळखा ?

 • 1. बहुव्रिही समास
 • 2. इतरेतर द्वंद्व समास
 • 3. समाहार द्वंद्व समास
 • 4. कर्मधारय समास

.

Q 23. वाक्यातील नामाच्या रुपावरुन वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास काय म्हणतात.

 • 1. नपुसकलिंग
 • 2. पुल्लिंग
 • 3. स्रीलिंग
 • 4. उभयलिंग

.

Q 24. 'षटकोनी' या शब्दाचा समास ओळखा ?

 • 1. समाहार द्वंद्व समास
 • 2. द्विगू समास
 • 3. इतरेतर द्वंद्व
 • 4. अव्ययीभाव समास

.

Q 25. पाणि दुषीत होणार नाही याची काळजी ध्यावी. या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील पर्यायातून निवडा ?

 • 1. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • 2. पाणि दुषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • 3. पाणि दूषित होणार नाही याची काळजी यावी.
 • 4. पाणी दूषित होणार नाही यांची. काळजी द्यावी.

.
. आणखी वाचा

1 comment:

Powered by Blogger.