Header Ads

एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असणारी राज्य कोणती ते पहा -

 महाराष्ट्राला लाभले दोन उपमुख्यमंत्री

संविधानात उपमुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. राजाच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात संविधानामध्ये अनुच्छेद १६३(१) मध्ये व्याख्या करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री पदाची घटनेमध्ये कुठेही तरतुद आढळत नसल्याने हे  असंवैधानिक पद आहे. हे पद कॅबिनेट मंत्री पदाच्या समतुल्य समजले जाते.तसे असले तरी महाराष्ट्राला सध्या दोन उपमुख्यमंत्री लाभले असून, भारतातील एका राज्यात तर पाच उपमुख्यमंत्री आहेत.


महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे गट-फडणवीस  सरकारमध्ये समील होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंडानंतर अजित पवार थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून देवेंद्र फडणवीस आणि अजित  पवार असे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत.


उपमुख्यमंत्री पद म्हणजे नेमके काय?


राजाच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात संविधानामध्ये अनुच्छेद १६३(१) मध्ये व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार, मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री नेतृत्व करेल. मंत्रिमंडळ राज्यपालांना सल्ला देऊन त्यांच्या कामात मदत करेल. तसेच अनुच्छेद १६४ च्या उपकलम १ अनुसार, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील, तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतील. या दोन्ही अनुच्छेदामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केलेला नाही.


भारतातील कोणत्या  राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री आहेत ते पाहू .

 

◆ उत्तर प्रदेश राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून मुख्यमंत्री पदी योगी आदित्यनाथ असून  केशव प्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक असे दोन उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश राज्याला लाभले आहेत.


◆ नागालँड मध्ये हे भारतीय जनता पार्टीचे सरकार असून यान्थुंगो पॅटन व टीआर झेलियांग हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.


◆ मेघालय या राज्यात प्रीस्टोन टायन्सॉगं व स्नीवभलंग धर

हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.


◆ तसेच आंध्र प्रदेश या राज्यात वाय एस जगन मोहन रेड्डी यांचे सरकार असून या राज्यात 

आमजथ बशा शेख बेपारी, बुडी मुत्याला नायडू ,

के. नारायण स्वामी, कोट्टू सत्यनारायण

राजन्ना दोरा पीडीका हे पाच उपमुख्यमंत्री आहेत.


◆ तसेच त्यानंतर नंबर येतो महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार असून देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री  आहेत.


राज्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा हा इतर कॅबिनेट मंत्र्यांएवढाच असतो. कॅबिनेट मंत्र्याला जो पगार आणि भत्ता मिळतो, तेवढाच उपमुख्यमंत्र्यांनाही मिळत असतो.

No comments

Powered by Blogger.